आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवराईत बिबट्याच्या ‘पाऊलखुणा’, ‘अापलं पर्यावरण’च्या स्वयंसेवकांत समाधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जंगले नष्ट हाेत असल्याची केवळ चिंता वाहता ११ हजार झाडे लावून अाणि त्यांचे संवर्धन करून नवीन जंगलच उभे करणाऱ्या अापलं पर्यावरण संस्थेच्या कष्टाला यश येताना दिसत अाहे. या संस्थेने फुलविलेल्या देवराईत दुसऱ्यांदा बिबट्याच्या पायाचे ठसे अाढळून अाले अाहे. त्यामुळे देवराईसाठी झटणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये अपूर्व उत्साह अाहे. 
 
पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी सातपूर परिसरातील फाशीच्या डाेंगराजवळ दिवसभरात सुमारे ११ हजार राेपांची लागवड करून विक्रम केला. या जागेला देवराई नाव देऊन सलग तीन वर्षे या राेपांची काळजी घेण्याची जबाबदारी संस्थेने स्वयंस्फूर्तीने स्वीकारली. त्यानंतर पुन्हा तेथे विविधप्रसंगी राेपांची लागवड करीत देवराईवरील राेपांची संख्या संस्थेच्या हरित सैनिकांनी सुमारे १२ हजारापर्यंत पाेहाेचली. सातत्याने राेपांची याेग्यप्रकारे काळजी घेऊन सर्वच राेपे विविध संकटांवर मात करीत जगविले. सद्यस्थितीत येथील राेपांची दमदार वाढ हाेत अाहे. विविध प्रकारच्या फळाफुलांबराेबर वन्यप्राण्यांचा वावरदेखील अाता या भागात वाढला अाहे. हा भाग अतिशय शांत असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी येथे अाढळत अाहे. देवराईत शनिवारी (दि. १६) सकाळी गवत साफ करण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवकांना चिखलावर बिबट्याच्या अाणि तरसाच्या पायाचे ठसे अाढळून अाले. अशाप्रकारचे ठसे दुसऱ्यांदा अाढळून अाल्याने स्वयंसेवकांमध्ये एकच अानंदाेत्सव साजरा झाला. 
 
वासाळीच्या जंगलात बिबट्यांचा अधिवास 
जवळच असलेल्यावासाळीच्या जंगलात बिबट्या अाणि तरसाचा अधिवास अाहे. देवराईत अाढळलेले ठसे हे बिबट्याचे अाणि तरसाचेच अाहेत. 
- सुनील वाडेकर, वनाधिकारी 
 
सुरक्षित अधिवास लाभल्यास उद्देश साध्य हाेईल... 
या परिसरात बिबट्याचा अधिवास अाहे. देवराईत ताे अाल्याने अाम्हाला अतिशय अानंद झाला अाहे. यानिमित्ताने त्याला सुरक्षित अधिवास मिळाल्यास अामचा देवराईचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य हाेईल. 
- शेखर गायकवाड, संस्थापक, अापलं पर्यावरण 
बातम्या आणखी आहेत...