आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाठू या उज्जयिनी नगरी, पदरी पडेल काही तरी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधू,महंत अाणि भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरलेला कुंभमेळा नाशिककरांनी ‘याचि देही, याचि डाेळा’ अनुभवला... नगराच्या प्रथम पाैरांनाही या कुंभात मानाचे स्नान करण्याचा ‘राजयाेग’ अाला... कुंभ पर्वण्या संपल्यानंतर अाता अापल्यासह अापल्या पक्षाला साेनियाचे दिन येतील, अशी भाेळी अपेक्षा या भाेळ्या भाबड्या, धार्मिक वृत्तीच्या महापाैराला वाटणे स्वाभाविकच... पण घडले मात्र उलट... जशा पर्वण्या संपल्या तशी पक्षाची पडझड सुरू झाली.. ही पडझड राेखण्यासाठी की काय, पण अाता महापाैर तिकडे मध्य प्रांतातील उज्जयिनी नगरीत दुसऱ्या शाही स्नानाचा मुहूर्त साधत डुबकी मारणार अाहेत म्हणे... त्यातून पक्षाचा ‘कुंभ’ दिवसेंदिवस अाणखी रिताच हाेत जाणार की, माेलाची भर पडून ओसंडून वाहू लागणार, हे ताे उज्जैनचा महाकालेश्वरच जाणाे...

कुंभमेळा काळात महापाैरपद भूषवत साधू-महंतांचा निकट सहवास लाभून त्यांची सेवा करण्याचीही संधी मिळणे अाणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अखिल भारतातीलच नव्हे, तर जगातील माध्यमांसमाेर चमकायला मिळण्याची संधी मिळणे म्हणजे जणू सुखाची पर्वणीच.. काही मंडळी तर कुंभमेळ्यात घातलेला महापाैरपदाचा काेट वर्षानुवर्षे काढायला तयार हाेत नाहीत... यंदाच्या कुंभमेळ्यात महापाैरपद भूषविण्यासाठी अनेकांनी तयारी केली खरी, पण हा याेग जुळून अाला ताे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘बलदंड’ व्यक्तिमत्त्वाला.. उक्तीने अाणि कृतीनेही कमालीचे श्रद्धाळू असलेले हे महाशय कुंभमेळ्याच्या काळात भलतेच रमून गेलेले दिसले. दिसेल त्या साधूला नमन करणे अाणि त्याची मुखवाणी अापल्या भ्रमणध्वनी संचात बंदिस्त करून घेणे ही त्यांची त्या काळातील सवय अाजही या स्मरणात अाहे. शाहीस्नानाप्रसंगी केवळ डुबकी मारण्यावर समाधान मानता त्यांच्यातील जलतरणपटूही नाशिककरांनी पाहिला. तिन्ही स्नानानंतर अाता अापल्यासह अापल्या पक्षाचे भले हाेईल, जी काही कुरबुर असेल ती वाहून जाईल अशी अपेक्षा त्यांची असणे स्वाभाविक. पण, स्नाना- प्रसंगी काय ‘अधर्म’ झाला असेल ताे असाे, पक्षामागे मात्र पनाैतीच लागली. प्रारंभीच्या काळातील ४० शिलेदारांमधील १३ जणांनी पक्षाला रामराम ठाेकत अन्यत्र घराेबा केला. ही पडझड अजूनही सुरू अाहे. त्यामुळे शाहीस्नानातून काय साध्य झाले, असा प्रश्न महापाैरांना अस्वस्थ करीत नसेल तर नवलच. पण, अजूनही या श्रद्धाळूची भाेळी भक्ती जिवंत अाहे. उज्जैन कुंभमेळ्यात मे राेजी हाेणाऱ्या दुसऱ्या पर्वणीत क्षिप्रेत डुबकी मारून पक्षासाठी पुण्यप्राप्तीची तयारी त्यांनी सुरू केली अाहे म्हणे. पक्षाने प्रारंभी विकासाचा अमृतकुंभ तर दाखविलाच, त्याची इतर शहरांमध्ये शाही मिरवणूकही काढली. पण, त्याचे थेंब नाशिकनगरीत काही पडलेच नाही. त्यामुळे अाता या पर्वणी स्नानातून नेमके काय साध्य हाेणार, याचे ‘राज’ उज्जैनच्या त्या श्री महाकालेश्वरालाच ठाऊक.