आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा ताब्यात घ्या; अन्यथा सेवा बंद करू, परिवहन महामंडळाचे महापालिका अायुक्तांना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अाणि नगरपालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच अाहे. त्यामुळे महापालिकेने ही सेवा तातडीने चालू करावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक महापालिकेच्या अायुक्तांना दिले अाहे. इतकेच नाही तर शहर बससेवेचा १०८ काेटी ७१ लाखांचा ताेटाही महापालिकेने भरून द्यावा, अशी मागणी व्यवस्थापकीय संचालकांनी अायुक्तांकडे केली अाहे. 
 
ताेट्यात चालणारी शहर बससेवा बंद करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडूनच अाता माेठे प्रयत्न सुरू झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालकांनी अायुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले अाहे की, राेड ट्रान्सपाेर्ट काॅर्पाेरेशन अॅक्ट १९५०च्या कलम मधील तरतुदीनुसार राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात अाली अाहे. त्यानुसार काही महापालिकांची हद्द वगळता राज्यभरात टप्प्यानिहाय प्रवासी वाहतूक महामंडळाकडून चालविली जाते. त्याचप्रमाणे महामंडळ काही महापालिका अाणि नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक ग्रामीण भागामध्ये सेवा चालविते. वास्तविक, महापालिका अाणि नगरपालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच अाहे. केवळ सामाजिक बांधिलकी या नात्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळ महापालिका नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये ताेटा सहन करून शहरी वाहतूक चालवित अाहे. 

मागील पाच वर्षांमध्ये नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळातर्फे दैनंदिन सरासरी २०८ नियते, एकूण ८९१.३२ किलाेमीटर चालविण्यात अालेले असून या वाहतुकीमुळे महामंडळास सुमारे १०८७७१.१० (लाख) ताेटा झाला अाहे. सदर शहर बससेवा सद्यस्थितीत चालवत असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या ताेट्यामध्ये दिवसेंदिवस वाढच हाेत असल्याने महामंडळाची अार्थिक स्थिती खालावत अाहे. अशा स्थितीत सिटी बससेवा चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. या सेवेमुळे हाेणाऱ्या ताेट्याची भरपाई पालिकेमार्फत महामंडळास करावी. अन्यथा ताेट्यात चालणारी ही सेवा बंद करण्यात येईल, असा इशाराही व्यवस्थापकीय संचालक तथा महामंडळाच्या उपाध्यक्षकांनी पत्राद्वारे महापालिकेला दिला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...