आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोजकुमार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा’ यासारखी लावणी, ‘सलाम ए इश्क मेरी जान’ हा मुजरा, ‘चिकनी चमेली’ आयटम सॉँग असे विविध नृत्यप्रकार सादर करीत नाशिक आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना चित्रपट निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, अभिनेते डॉ. विलास उजवणे, लघुपटांच्या परीक्षक ज्येष्ठ अभिनेत्री रमा विज, मेरी बॉश, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. आमदार बबनराव घोलप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आयोजक मुकेश कणेरी यांनी मनोगत मांडले. अभिनेत्री इला कृती, वृषाली हटाळकर आदी कलाकारांनी या वेळी विविध परफॉर्मन्स सादर केले.