आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेप हाेताच हिसकावली बंदूक, पोलिसाच्या हातातील बंदूक हिसकावल्याने न्यायालयात थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड येथील युवकाच्या खून प्रकरणात दाेघा बंधूंना जन्मठेपेची शिक्षा हाेण्याचे न्यायालयात निश्चित हाेताच त्यातील एकाने बंदाेबस्तावरील पाेलिस कर्मचाऱ्याच्या हातातील एसएलअार (बंदूक) हिसकावून घेत न्यायालय कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी तत्काळ त्याला पकडून हातातून बंदूक अाेढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
साेमवारी दुपारच्या ‌सुमारास घडलेल्या या प्रकाराने न्यायालयात गाेंधळ निर्माण हाेऊन एकच घबराट पसरली. सदर घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांसह जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालय अावारात धाव घेतली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या नवीन इमारतीत अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या समाेर हा प्रकार घडला. अंबड येथील सागर जाधव याच्या दाेन वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील मुख्य संशयित संजय अशाेक नागरे राजू नागरे यांच्यासह अाठ जणांविरुद्ध सुनावणी सुरू हाेती. न्यायालयाने दाेघा बंधूंना दाेषी ठरविल्याचे सांगत शिक्षा दुपारनंतर सुनावण्यात येणार असल्याचा निकाल दिला. अाराेपींना न्यायालयाच्या दालनातून पाेलिस बाहेर अाणत असतानाच नागरे बंधूंपैकी एकाने पाेलिसाच्या खांद्याला असलेली बंदूक हिसकावून घेत पुन्हा न्यायालय कक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार संबंधित पाेलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास पकडून बंदूक खेचून घेतली. या प्रकाराने गाेंधळ निर्माण हाेऊन तणाव निर्माण झाला हाेता. शिक्षा झाल्याने नातेवाइकांमध्ये आक्रोश सुरू असतानाच हा प्रकार घडला.

न्यायाधीशांच्या समाेरच हे सारे घडल्याने त्यांनी तातडीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर अाराेपींची बाजू मांडणाऱ्या दाेघा वकिलांना बाेलावून घेतले. अॅड. मिसर यांनीही पाेलिस अायुक्तांना घटनेची माहिती दिली. पाेलिसांनी तातडीने न्यायाधीशांच्या सुरक्षिततेत वाढ केली.
आर्थिक वादातून युवकाच्या खून प्रकरणात दोन दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तीन आरोपींना सहा महिन्याचा कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली. सोमवारी (दि.१९) श्रीमती मोरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दोन वर्षापुर्वी अंबड येथे खुनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबड येथील पंडीतनगर येथे १९ सप्तेंबर २०१४ ला रात्री वाजता सागर जाधव याचा कामावरुन घरी जातांना किराणा दुकानाजवळ आरोपी संजय नागरे, राजू नागरे, अशोक नागरे, विजय नागरे, गणेश नागरे, मंदाबाई नागरे, यांनी चाकु, तलवारीने वार करुन खून केला होता. मयताची आई सुमन जाधव यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु होता. न्यायालयाने संजय नागरे, राजू नागरे यांना जन्मठेप तर अशोक नागरे, गणेश नागरे, विजय नागरे, मंदाबाई नागरे यांना सहा महिन्याची शिक्षा ठोठवली. अंबड पोलीस ठाण्याचे तात्कालीन निरिक्षक दिनेश बर्डेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.
अनर्थ टळला
न्यायालयात अाराेपींसाेबतच्या पाेलिस कर्मचाऱ्यांजवळील एसएलअार (बंदूक) अाराेपीने हिसकावून न्यायालयात घुसताना तिचा ट्रिगर दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, बंदूक लाॅक असल्याने माेठा अनर्थ टळला.

अाजचा प्रकार गंभीर
^न्यायालय अावारात अाराेपी त्यांच्या नातलगांकडून गोंधळाचा प्रकार घडत असताे. मात्र, अाजचा प्रकार अधिक गंभीर असल्याने तत्काळ पाेलिस अायुक्तांशी चर्चा करीत अतिरिक्त बंदाेबस्त तैनात करण्याची सूचना केली. -अजय मिसर, जिल्हा सरकारी वकील
बातम्या आणखी आहेत...