आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Of Police Sub Inspector Saved In Nasik Using Prepaid Rikshaw

प्रीपेड रिक्षामुळे वाचले पोलिस उपनिरिक्षकाचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून शहरात जाणार्‍या प्रवाशांची लूटमार रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सुरू केलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, रेल्वेतून पडलेल्या जखमीला वेळीच उपचार मिळवण्यासाठी प्रीपेड रिक्षातूनच रेल्वे पोलिसांनी जखमीला रुग्णालयात पोहचविले. ऐन वेळी रुग्णवाहिका मिळाली नसताना रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे जखमीचे प्राण वाचल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या सेवेला प्रवाशांकडून आठवडाभरात रोज उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रीपेड रिक्षासेवेला प्रवासी प्राधान्य देत आहेत.

काय घडली घटना : सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेस पकडण्याच्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक के. व्ही. सुरसे जखमी झाले. त्यांच्या उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी नेम फाउंडेशनच्या 108 व मनपा, खासगी रुग्णवहिकेला संपर्क साधला; मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे बघून, रेल्वे पोलिस दलाचे अधिकारी भोये व कर्मचारी मोरे यांनी प्रीपेड रिक्षाच्या बूथवर संपर्क साधला. त्या ठिकाणी पाच मिनिटात रिक्षा उपलब्ध झाली व एखाद्या रुग्णवाहिकेप्रमाणे विनाथांबा रिक्षा जिल्हा रुग्णालयात पोहोचली. यावेळी सहायक मोटार निरीक्षक अतुल चव्हाण, गिरीश मोहिते उपस्थित होते.