आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइफलाइन एक्स्प्रेस नाशिकरोडला दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - आंतरराष्ट्रीय सोहळा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी मध्य रेल्वेची मिनी आॅपरेशन थिएटरसह वविध अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली ‘लाइफलाइन एक्स्प्रेस’ सोमवारी (दि. १७) नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दाखल झाली आहे. ही गाडी भाविकांच्या सेवेसाठी २४ तास स्थानकावर तैनात असेल, अशी माहिती मध्यरेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांसह भाविकांच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांसाठी रेल्वे प्रशासनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, देशभरातून विशेष तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या खास सोडण्यात आल्या आहेत. साधुग्राममध्ये बुधवारी (दि. १९) अखाडा ध्वजारोहण सोहळा होणार असल्याने देशभरातील भाविक नाशकात येऊ लागले आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी लाइफलाइन एक्स्प्रेस दोन दविसअगोदरच स्थानकावर तैनात झाली आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली तीन कोचच्या लाइफलाइनमध्ये मिनी आॅपरेशन थिएटर असून, त्यात छोट्या शस्त्रक्रियादेखील करता येणार आहेत. मात्र सध्या भाविक रुग्णांच्या सेवेचा शुभारंभ झाला नसल्याने तीन कोचची एक्सप्रेस साइडला लावली आहे. तर स्थानकाच्या दोन्ही बाजूला रेल्वेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाले आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर लाइफलाइन एक्स्प्रेस सोमवारी दाखल झाली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यात आरोग्यसुविधा तसेच रुग्णवाहिका इत्यादी गोष्टींची सोय आहे. सध्या ही गाडी साइडला लावण्यात आली आहे.

सुमारे दोन हजार प्रवासी थांबतात
देशभरातून नाशिकरोड स्थानकावर येणाऱ्या भाविकांची दररोजची संख्या सुमारे २० हजाराच्या आसपास असून, परतीच्या प्रवाशांची संख्या सुमारे १८ हजार आहे. उर्वरित दोन हजार प्रवासी सिंहस्थाच्या निमित्ताने नाशकात थांबत असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

वापर होण्यापूर्वीच झाली तोडफोड
रेल्वेस्थानकावर सिंहस्थासाठी नव्याने तयार केलेल्या चौथ्या प्लॅटफार्मवर भाविक, प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी शौचालय, स्वच्छतागृह उभारले आहे. त्याचा वापर अद्याप सुरू झालेला नसताना अज्ञात लोकांकडून शौचालयातील नळांची तोडफोड केली आहे.