आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकुंभ ज्याेतीची लिम्का रेकाॅर्ड्सकडून दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- सिंहस्थातयंदा १०८ दिवस अखंडित प्रज्वलित राहणारी महाकुंभ ज्याेत भाविकांचे अाकर्षण ठरणार अाहे. कुंभ ज्याेतीची दखल लिम्का बुक वर्ल्ड रेकाॅर्ड‌्सनेही घेतली अाहे.

जय गाेपाल गायत्री सिद्धपीठ माेहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठानतर्फे साधुग्राममधील लक्ष्मीबागेत तीन एकर जागेत ब्रह्मा, विष्णू महेश या त्रिदेवांच्या ज्ञान विश्वशांती महायज्ञ, महाकुंभ ज्याेत, प्रवचन हाॅलची उभारणी सुरू अाहे. तिळाच्या तेलामुळे ऊर्जा मिळून शक्ती प्राप्त होत असल्याने कुंभ ज्याेत प्रज्वलित राहणार अाहे.

देशाच्या तीन हजार ६१७ किलाेमीटर लांबीप्रमाणेच्या अखंड कच्च्या धाग्यात ज्याेतीची वात २० कारागिरांनी दाेन महिन्यांत तयार केली आहे. कच्चा धागा तीन हजार ६१७ वेळा अर्धा किलाेमीटर लांबीत गुंडाळून ५०० मीटर अर्थात १५०० फूट चार इंच गाेलाकार केल्यानंतर २४ फूट लांब फूट उंचीची वात तयार झाली.

सुबत्तेची कामना, पापमुक्ती शक्य
सूर्य,चंद्र, तारे अाणि अग्नी हे प्रकाशाचे प्रतीक अाहेत. कुंभ ज्याेतीच्या दर्शनाने सुबत्ता, संपत्तीची कामना, तसेच पापमुक्ती शक्य अाहे. -श्री श्री१००८ श्री हिमालय बाबा

मंगळवारी होणार प्रज्वलित
अखंडमहाकुंभ ज्याेत मंगळवारी (दि. १४) सकाळी वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्राग्नीद्वारेे प्रज्वलित हाेणार अाहे. बबनरावघाेलप, मुख्य संयाेजक