आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकुंभ ज्याेतीची लिम्काकडून दखल, १०८ दिवस अखंडित प्रज्वलित राहणार ज्याेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून असंख्य साधू-संत नाशिकमध्ये दाखल हाेत असून साधूग्राममध्ये त्यांची निवासव्यवस्था करण्यात येत अाहे. - Divya Marathi
कुंभमेळ्यानिमित्त देशभरातून असंख्य साधू-संत नाशिकमध्ये दाखल हाेत असून साधूग्राममध्ये त्यांची निवासव्यवस्था करण्यात येत अाहे.
नाशिक - दर बारा वर्षांनी भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात यंदा १०८ दिवस अखंडित प्रज्वलित राहणारी महाकुंभ ज्याेत भाविकांचे अाकर्षण ठरणार अाहे. या कुंभज्याेतीची दखल विश्व रेकाॅर्ड, लिम्का ग्रुपने घेतली अाहे.

जय गाेपाल गायत्री सिद्धपीठ अाणि माेहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने साधुग्राममधील लक्ष्मीबागेच्या तीन एकर जागेत ब्रह्मा, विष्णु व महेश या त्रिदेव ज्ञान विश्वशांती महायज्ञ, महाकुंभ ज्याेत, भागवत कथा प्रवचन हाॅलची वेताच्या काठ्यांमध्ये उभारणी काम सुरू अाहे. तिळाच्या तेलामुळे ऊर्जा निर्माण हाेऊन शक्ती मिळत असल्याने ही कुंभज्याेत तिळाच्या तेलात प्रज्वलित राहणार अाहे. कुंभ ज्याेतीला हवा लागू नये तसेच पावित्र्य राहण्यासाठी १२ फूट काचेचे कव्हर तयार करण्यात अाले अाहे.

अखंडित कुंभज्याेत
संपूर्ण भारताची लांबी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ३ हजार ६१७ कि.मी. अाहे. इतक्याच लांबीच्या अखंड कच्च्या धाग्यात ज्याेतीची वात तयार करण्यात अाली अाहे. काेल्हापूरच्या रत्नप्पा कुंभार मागासवर्गीय सूत गिरणीतील २० कारागिरांनी त्यासाठी दाेन महिने अथक परिश्रम घेतले. २४ फूट लांब ९ फूट उंचीची ही वात १०८ दिवस महाकुंभ ज्याेतीत अखंड प्रज्वलित राहणार अाहे. भारतात प्रथमच यापद्धतीची ज्याेत अखंडित प्रज्वलित राहणार असल्याने देशभरातून येणा-या भाविकांसाठी ही ज्याेत अाकर्षण ठरणार अाहे.

१४ राेजी होणार प्रज्वलन
अखंड महाकुंभ ज्याेत बुधवार १४ जुलै राेजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्र अग्नीने प्रज्वलित केली जाणार अाहे. - बबनराव घाेलप, मुख्य संयाेजक