आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक विमानतळावर अधिकार्‍यांची ओली पार्टी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विमानांचे टेक ऑफ होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिकच्या विमानतळावर शनिवारी रात्री सरकारी अधिकार्‍यांनीच नशेचे ‘टेक ऑफ’ केल्याचे उघडकीस आले आहे. बांधकाम विभागातील मुख्य अभियंत्यांच्या निवृत्तीनिमित्त या कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे बांधकाम व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पाटर्पला परवानगी देण्यात आली होती.

बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विमानतळावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ३५ ते ४० गाड्यांचा ताफा आला होता. शनिवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेली पार्टी ११ वाजेपर्यंत रंगली. त्यानंतर विमानतळावर ढिगभर मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. विशेष म्हणजे, विमानतळ बांधकामाचे ठेकेदार, हर्ष कन्स्ट्रक्शनचे चेअरमन विलास बिरारी यांनीच पार्टीचे आयोजन केले होते. त्यांनी या पार्टीचे समर्थनही केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जानोरीच्या सरपंचांनी माहिती दिल्यानंतर मी घटनास्थळी पाहणी केली. तिथे मद्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, अशी माहिती दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.