आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारूची वाहतूक रोखणाऱ्या सरपंचावर दारूमाफियांचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - पालघर तालुक्यातून त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात वाहनातून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनास अडवणाऱ्या देवगाव, ता. त्र्यंबकेश्वर येथील सरपंचास दारूची अवैद्य वाहतूक करणाऱ्या त्रिकुटांनी हल्ला करीत बेदम मारहाण केली. या घटनेत सरपंच गंभीर जखमी झाले असून, तिघा संशयितांविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत घोटी पोलिस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पालघर तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरीमधील अनेक गावांत सर्रासपणे गावठी दारूची वाहतूक होत असून, मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत अाहे. यामुळे अनेक युवक व्यसनाधीन झाले अाहे. याबाबत देवगाव येथील महिलांनी सरपंच विठ्ठल काशीराम वारे यांच्याकडे कैफियत मांडून हे धंदे बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास देवगाव येथून रायपाडा येथे दुचाकीवरून जात असताना सरपंच वारे यांना समोरून मॅक्झिमो (क्रमांक एम.एच.१५ इजी ३५४३) हे वाहन दिसले. सरपंच वारे यांनी हे वाहन थांबवून हटकले असता वाहनातील संशयित तानाजी पंचांगे त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनी वारे यांच्यावर हल्ला करीत बेदम मारहाण केली. यात वारे हे गंभीर जखमी झाले. या वाहनात अवैध दारूची वाहतूक हाेत असल्याचे वारे यांना समजले हाेते.
बातम्या आणखी आहेत...