आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टागाेरनगरातील दारू दुकान संतप्त महिलांनी बंद पाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - श्रीश्री रविशंकर मार्गावरील टागोरनगर परिसरात एका इमारतीच्या गाळ्यामध्ये सुरू केलेले दारू दुकान शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी स्थानिक महिलांनी बंद पाडले. त्याअाधी हे दुकान तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी साधू-महंतांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह विभागीय आयुक्तांकडे केली. विशेष म्हणजे हे अांदाेलन फेसबुकवर लाइव्ह करण्यात अाले हाेते. 
 
महादेव अपार्टमेंटच्या एका गाळ्यामध्ये महारानी वाइन्स नावाचे हे दुकान सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मद्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये वादावादी होऊन हाणामारीचे प्रसंग घडले आहेत. परिणामी, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुले महिलांना त्याचा त्रास हाेत आहे. 
 
या दुकानाविरोधात बारा दिवसांपासून निदर्शने सुरू अाहेत. मात्र, ते स्थलांतरित करण्याबाबत निर्णय होत नसल्याने अखेर महंत षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत डॉ. बिंदू महाराज, महामंडलेश्वर दीपानंद सरस्वती, महंत गिरिजानंद सरस्वती, महंत गणेशानंद यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विभागीय आयुक्त महेश झगडे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देऊन रहिवासी भागातील हे दुकान स्थलांतरित करण्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी महिलांनी अाक्रमक पवित्रा घेत दुकानाचे शटर अाेढून घेतले. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरसेविका सुषमा पगारे, गणेश कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

हाणामारीचा व्हिडिओ दाखवला : टागाेरनगरपरिसरातील या ठिकाणी दारू घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये वादावादी अाणि हाणामारीचे प्रसंग घडतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घराच्या बाहेर पडण्यास नागरिकांना भीती वाटत आहे. या हाणामारीचे व्हिडिओही नागरिकांनी यावेळी पोलिस आयुक्तांना दाखवत कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी केली. 
 
सुरक्षिततेचा विचार अधिकाऱ्यांनी करावा 
^या दुकानामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली अाहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी हे दुकान स्थलंातरित करण्याबाबत निर्णय घ्यावा. -महंत डाॅ. बिंदू महाराज 

दुकान लवकर स्थलांतरित करावे 
^टागाेरनगर परिसर या रहिवासी भागातील दारू दुकानामुळे परिरसरात अशांतता निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांच्या अडचणी, सुरक्षितता लक्षात घेता दुकान स्थलांतरित करण्यात यावे. -महामंडलेश्वर दीपानंद सरस्वती 

साधू-महंतांनी वेधले समस्येकडे लक्ष 
श्रीश्री रविशंकर मार्गावरील टागाेरनगर परिसरातील या दारू दुकानामुळे या परिसरातील विद्यार्थी, भाविकांसह महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत साधू, महंतांनी तातडीने दुकान स्थलांतरित करण्याची विनंती केली. 

 
बातम्या आणखी आहेत...