आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणत्याही स्थितीत दारू दुकान हाेऊ देणार नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवीन तिडके कॉलनीतील इमारतीत सुरू होणाऱ्या दारू दुकानाविरोधात परिसरातील महिलांची आक्रमक भूमिका कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी वाइन शॉप सुरू करण्यात येऊ नये यासाठी दोन दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, हे दुकान सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना महिलांनी निवेदन दिले. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 
 
लंबोदर अव्हेन्यू या इमारतीत भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या एका गाळ्यात दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानात मद्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे परिसरात अशांतता, अवैध प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने, तसेच मुलांवर यामुळे वाईट परिणाम होणार असल्यामुळे रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. दुकान सुरू करण्यासाठी आणलेल्या दारूच्या बाटल्या सोमवारी (दि. १०) सायंकाळी रस्त्यावर फोडत महिलांनी अाक्रमक आंदोलन केलेे. तसेच, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाला दुकान सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. 

बुधवारी संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांची महिलांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन या भागात दारू दुकान सुरू होऊ देण्याची मागणी केली. भामरे यांनी याबाबत माहिती घेऊन कोणत्याही परिस्थितीत त्या भागात दारूचे दुकान सुरू होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी रूपाली कुलकर्णी, पूनम पाटील, रश्मी भदाणी, मीना चव्हाण आदींसह रहिवासी उपस्थित होते. 

उच्च न्यायालयात जनहित याचिका 
तिडके कॉलनी या रहिवासी भागात दारू दुकानाला परवानगी देऊ नये यासाठी अरुण पाटील शिवराज आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. 

अथर्वशीर्ष पठण अन‌् गणेशाची प्रार्थना... 
रहिवासी क्षेत्रात दारूचे दुकान सुरू झाल्यास त्याचा विपरित परिणाम परिसरावर होणार असून, येथून शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही वाईट संस्कार होणार असल्याने बुधवारी (दि. १२) दुपारी वाजता या गाळ्याशेजारी असलेल्या गणपती मंदिराजवळ महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करीत दारू दुकानचालक गाळामालक यांना गणरायाने सद‌्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली. 
 
बातम्या आणखी आहेत...