आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती स्थापून रहिवासी भागातील दारू दुकान बंद करण्याचे साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - श्रीश्री रविशंकर मार्गावरील टागोरनगर या रहिवासी भागात सुरू झालेल्या दारू दुकानाला परिसरातील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. १५) या दुकानासमोर गणपतीची स्थापना करण्यात आली. गणपतीची आरती करत दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी साकडे घालण्यात आले. दारू दुकान सुरू होऊ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. टागोरनगर येथील महादेव अपार्टमेंट येथे महाराणी वाइन्स नावाने दारू दुकान सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांमध्ये वादावादी होत असल्याने परिसरात अशांतता निर्माण होत होती. याचबरोबर परिसरात असणाऱ्या शाळा, मंदिरात जाणाऱ्या लहान मुले भाविकांना यांचा त्रास सहन करावा लागत होता. या दुकानामुळे होणाऱ्या त्रासामुळे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन करत दारूचे दुकान बंद पाडले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी या दुकानाच्या समोरील जागेत गणपतीची स्थापना करण्यात आली. या दुकानासमोर परिसरातील महिला, लहान मुले फलक घेऊन निदर्शने करत हे दारू दुकान कोणत्याही स्थितीत सुरू होऊ देण्याबाबत परिसरातील नागरिक, महिलांनी निर्धार व्यक्त करण्यात आला. १००८ महामंडलेश्वर दीपानंद सरस्वती, माधवी पाटील, दीप्ती गायकवाड, महाराष्ट्र दारूबंदीचे गणेश कदम आदींसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. 
पोलिसप्रशासनाकडून नोटीस, मात्र नागरिकांकडून स्वीकारण्यास नकार : शुक्रवारीसायंकाळी महिलांनी उग्र रूप धारण करत हे दारू दुकान बंद पाडले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शनिवारीही या दुकानासमोर बसत कोणत्याही स्थितीत दुकान सुरू होऊ देण्याबाबतची भूमिका घेतली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता उपनगर पोलिस स्टेशनच्या वतीने या इमारतीतील नागरिकांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत नोटीस बजाविण्यात आल्या. मात्र, नागरिकांकडून नोटीस स्वीकारण्यास नकार देण्यात आला. 

घोषणा फलकांनी वेधले लक्ष 
दारूपळवा, शहर वाचवा, दारूमुळे कुठलेही समस्या सुटत नाही असे घोषणा फलक घेऊन या दारू दुकानांच्या परिसरात महिला लहान मुले निदर्शने करत आहे. हे घोषणा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 
बातम्या आणखी आहेत...