आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर घरापुढे दारू दुकाने काेणत्या कायद्याने?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दारूच्या दुकानासमाेर अाम्ही अांदाेलन करू शकत नाही असे तुमचा कायदा सांगताे; तर मानवाधिकार पायाखाली तुडवत तुम्ही अामच्या घरासमाेर दारूची दुकाने कशी सुरू शकता? अाम्ही दारूची दुकाने बंद करण्यासाठी नाही तर ती नागरिकांना त्रास हाेणाऱ्या भागातून इतरत्र हलवण्यासाठी अांदाेलन करीत अाहाेत. त्यामुळे ही दुकानांचे स्थलांतर दुसरीकडे करा; अन्यथा अाम्ही अामच्या पद्धतीने पावले उचलू त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील,’ असा इशारा बिंदू धामचे महंत बिंदु महाराज यांनी दिला. 
 
शहरात नव्याने सुरू हाेणाऱ्या दारू दुकानांना महिलांसह नागरिकांचा माेठ्या प्रमाणात विराेध हाेत असल्याने पाेलिस अायुक्तांनी महिलांसह राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. २०) संयुक्त बैठक घेतली. पाेलिस अायुक्तालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस पाेलिस उपायुक्त विजयकुमार मगर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, पाेलिस निरीक्षक न्याहाळदे, बाजीराव महाजन,अशाेक भगत तसेच त्र्यंबकेश्वरच्या बिंदु धामचे महंत बिंदू महाराज, धर्माचार्य दीपानंद सरस्वती, माधवी पाटील, गणेश कदम, प्रतिमा पुंडे, प्राजक्ता सूर्यवंशी, भारती करे, सुनिता साेनवणे, शीतल साेलंकी, मनिषा हेमगिरे, शरयु शिंदे, शकुंतला गायकवाड अादी उपस्थित हाेते. 

बैठकीच्या प्रारंभीच पाेलिस उपायुक्तांनी दारू दुकानांना विराेध असणाऱ्या महिन्यातहाॅस्पिटल आणि डाॅक्टरांची बैठक आयोजित करण्याबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी कदम यांना सांगितले; मात्र अधिकाऱ्यांना गोदावरी प्रदूषण, प्लॅस्टिकमुक्ती आणि घनकचरा याबाबत विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आल्याने कदम यांनी चांगलेच फैलावर घेतले. यावेळी पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डाॅ. पी. अन्बलगन, विभागीय महसुल आयुक्त डाॅ. महेश झगडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, आमदार अनिल कदम, उपायुक्त रघुनाथ गावडे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, प्रकाश बोराडे, रोहन देशपांडे, राजेश पंडित अादी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...