आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: काेर्ट अादेशानंतर शहरातील सर्वच 365 दारू दुकाने सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमधील दारूची सर्वच दुकाने सुरू करण्याचा निर्णय देत सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील व्यावसायिकांना दिलासा दिला. त्यामुळे शहरातील ३६५ दुकाने सुरू झाली अाहेत. तर ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने गावांच्या हद्दीतील ४०० दुकाने कायमस्वरुपी बंद राहणार असल्याने ग्रामपंचायतींवर अन्याय झाला अाहे. 
 
दारूमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने महामार्गावरील ५०० आणि २२० मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यानच्या, काळात मनपा हद्दीतील रस्ते महापालिकेकडे वर्ग करून शहरातील दारू दुकाने, बिअर शॉपी, बिअर-बार सुरू करण्याचा मार्ग व्यावसायिकांसह शासनाने शोधून काढला. परंतु, आता न्यायालयाने त्यांच्या निर्णयात बदल केला आहे. याचिकार्त्यानेही यातून बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत आपली भूमिका काही अंशी सौम्य केली. त्यामुळे न्यायालयाने आता महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींवर मेहेरबानी केली आहे. न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशाला स्थगिती देत शहरी भागातील महामार्गावरील दुकाने सुरू करण्यास हरकत नसल्याचे आदेश दिले. त्याव्यतिरिक्त इतर परिसरातून अर्थात ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील दुकाने मात्र बंदच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. नव्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेशही राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना गुरुवारच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. 
 
सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार कार्यवाही 
न्यायालयाच्या आदेशानुसार आता मनपा, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या हद्दीतील दुकानेही सुरू करण्याचे आदेश राज्य उत्पादन आणि पोलिसांना दिले आहे. परंतु, त्या व्यतिरिक्त इतर भागासाठी हा निर्णय अद्यापही बंधनकारक आहे. 
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी 
 
५० दारू दुकानांच्या नूतनीकरणात अडचण 
सर्वोच्च न्यायालयाच्या दारू दुकाने सुरू करण्याच्या निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकाने तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले खरे. पण, सुरू करण्यात येणाऱ्या ३६५ दुकानांपैकी प्रत्यक्षात ३१५ दुकानेच शुक्रवार (दि. ८)पासून सुरू होतील. उर्वरित ५० दुकानांचे नूतनीकरण बाकी आहे. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नूतनीकरण शुल्क भरत त्याचे चलन फाडले नसल्याने त्यांना दुकान सुरू करण्यात दिवस लागण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...