आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature Awakening Community's Sensitivity, Bhaskar Chandanshiv Remarked

साहित्यामुळे समाजाची संवेदना होते जागृत,ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘कृषी आणि अध्यात्म हे पूर्वीपासून एकत्रित असून देव, संतांसह शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनीही कृषीलाच प्राधान्य देऊन समाजाची उन्नती केली आहे. समाज घडविण्यासाठी माणुसकीही महत्त्वाची असते, हे अध्यात्म आणि कृषीमध्ये दिसते. साहित्यामध्ये मूल्यांचा विचार केला जात असून त्यामध्ये समाजाची संवेदना जागी करण्याची शक्ती असते. त्यामुळे ख-या अर्थाने ज्या भागात गरज आहे, त्याच भागात साहित्य संमेलन होण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केले.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय कृषी साहित्य समंलेनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे कृषीमंत्री आणि स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आणि उद्घाटक अण्णासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विखे म्हणाले की, शेतक-यांचे एक लाख गट तयार केले आहेत. प्रत्येक गटाकडे किती व कोणता भाजीपाला आहे याची मिळत असल्याने देशात व दुबईलाही भाजीपाला विक्री करण्यासाठी सरकारने योजना सुरु केली आहे. यापुढे बाजारसमित्यांना शेतक-यांवर कोणताही निर्णय लादता येणार नाही.
मंत्र्यांची हजेरी प्रसिद्धीसाठी
प्रसिद्धी मिळणा-या साहित्य संमेलनामध्ये मंत्री हजर राहतात, त्यामुळे साहित्यिकांना बसायला जागा नसते. मात्र कृषी संमेलनाला निमंत्रित करुनही मंत्री उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे शेती आणि शेतकरी किती मागासलेला आहे हे लक्षात येते. मंत्री आणि राजकारणी केवळ प्रसिद्धीसाठी साहित्य संमेलनात वावरताना दिसतात, असे खडे बोल माजी संमेलनाध्यक्ष रा. रं. बोराडे यांनी सुनावले.