आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature World: This Year Jansthan Award Declared To Writer Arun Sadhu

साहित्यविश्‍व: ज्येष्ठ लेखक अरुण साधूंना या वर्षीचा ‘जनस्थान’ पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पत्रकारिता, स्तंभलेखन, कथा, कादंबरी अशा माध्यमातून मानवी विश्वाचा अंर्तबाह्य सूक्ष्मपट उमटविणारे ज्येष्ठ लेखक अरुण साधू यांना प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कोशाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी ही माहिती दिली.एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी साहित्यात विशेष कामगिरी आणि सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणा-या साहित्यिकाला हा पुरस्कार एक वर्षाआड देण्यात येतो. या पुरस्कारासाठी माझा विचार झाला याचा मला प्रचंड आनंद झाला. त्यामुळे कामाची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया साधू यांनी दिली.