आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अंगावरून चारचाकी वाहन जाऊनही साडेतीन वर्षांची चिमुकली बचावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आईसोबत रस्त्याने जात असताना पाठीमागून येणा-या चारचाकी वाहनाच्या खाली अालेली साडेतीनवर्षीय चिमुकली केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावली. जखमी झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. १८ दिवसांच्या उपचारानंतर कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय ती ठणठणीत बरी झाली अाहे.

झोया खान असे या चिमुरडीचे नाव अाहे. आई शरीनसोबत ती वडाळा रोड येथील रहनुमा शाळेजवळून जात असताना हा अपघात झाला. पोटावरून चारचाकी गेल्याने झोयाला तत्काळ खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. तपासणीनंतर शरीरात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. गाडीची दोन्ही चाके झोयाच्या अंगावरून गेल्याने तिच्या यकृत, किडनी आणि फुफ्फुसाला जोरदार मार लागला होता. त्यामुळे तिला श्वासोच्छ्वासही करता येत नव्हता.

सुरुवातीला झोयावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे पाहून तिचा रक्तगट तपासण्यात आला. तो ‘ए’ निगेटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टरांपुढील अडचणी वाढल्या. कारण या गटाचे रक्त सहजपणे मिळत नाही. अनेक अडचणींनंतर डॉक्टरांनी ए-निगेटिव्हएेवजी आे-निगेटिव्ह रक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अनेक तपासण्यांनंतर झोयावर शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूशी झुंज देणा-या झोयाच्या आईवडिलांची परिस्थिती पाहता त्यांची समजूत काढणे त्यांना झोया लवकर बरी होईल, असा अात्मविश्वास देणे डॉक्टरांसमोर आव्हान होते. तब्बल १८ दिवसांनंतर झोयाचा उपचार यशस्वी झाला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले.
नाशिकमधील वडाळा राेडवर चिमुकली झाेयाच्या अंगावरून वाहन जात असताना सीसीटीव्हीत कैद झालेला क्षण. (चाैकटीत) झाेया खान.

गाडी मालकाची मदत
झाेयाच्याघरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. परंतु अपघातग्रस्त वाहनमालकाने आर्थिक मदत केली. रहेबर संस्थेचे अध्यक्ष विकार पीरजादा यांनीदेखील मदत केली.

पुढे वाचा, डॉक्टरांकडून ईदची भेट