आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये फक्त शिडकावाच, पाऊस सुरू हाेण्याची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या जिल्हावासीयांना मान्सूनने अजूनही दिलासा दिलेला नाही. शहरासह बहुतांश भागात रविवारी तर दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. काेणत्याही क्षणी पाऊस येईल, ही अपेक्षा मात्र फाेल ठरली. नाशिक शहरासह नाशिकराेड, सिडकाे अशा उपनगरांमध्ये अगदी तुरळक शिडकावा झाला. अाणिमान्सूनची प्रतीक्षाच कायम राहिली. सात वर्षांपूर्वी माेसमी पाऊस उत्तर महाराष्ट्रात १९ जून रोजी दाखल होता. तर यंदाही तीच परिस्थिती अनुभवयास मिळत असून तब्बल १२ दिवस उलटले तरीही पावसाळा सुरू झालेला नाही.
त्र्यंबकसह जिल्ह्यात काही ठिकाणी एखादी सर अाली इतकेच. दरम्यान, हवामान विभागाने मात्र सोमवारी संपूर्ण राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यंदा तिसरा आठवडा उलटला तरी दाखल झाल्याने धरणे कोरडीठाक पडली आहेत. शहरवासीयांवरही पाणी कपातीसारख्या संकटाचा सामना करण्याची नामुष्की ओढवली असल्याने प्रत्येकजण पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सातत्याने वाऱ्याची दिशा बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम मान्सून स्थिर होण्यावर झाला होता. रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण असल्याने दुपारनंतर मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता होती. मात्र, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, देवळाली कॅम्पसह काही भागात फक्त शिडकावाच झाला.
राज्यभर सक्रिय हाेणार
^दक्षिणेकडून वेगानेपुढे सरकलेला मान्सून राज्यात यावर्षी विदर्भाकडून दाखल झाला अाहे. येत्या दोन दिवसांत ताे संपूर्ण राज्यात सक्रिय होणार आहे. सोमवारी त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी हाेण्याची शक्यता अाहे. - प्रल्हाद जायभावे, हवामानतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...