आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Load Shedding Time Increases In State, Divya Marathi

राज्यातील कोळसा साठा संपला भारनियमन वाढण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यात विक्रमी वीज उपलब्ध असूनही मागणीत २५ टक्के वाढ झाली आहे. त्यातच फ्रिक्वेन्सी व पॉवरग्रीडमुळे राज्यात सक्तीचे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगणा-या महावितरणने आता भारनियमनास कोळसा व गॅसच्या तुटीचे कारण सांगून संभ्रम निर्माण केला आहे.भारनियमनमुक्त महाराष्ट्र विक्रमी वीज उपलब्ध असल्याचा दावा करणा-या महावितरणचे कोणते कारण खरे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोळसा व गॅसच्या पुरवठ्यातील तुटीमुळे रोज सुमारे दोन हजार मे.वॅ.वीज कमी मिळत आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातुन किमान साडेपाच हजार मेगावॅट वीजेची अपेक्षा असतांना केवळ चार ते साडे चार हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मितीला रोज किमान ३२ कोळशाचे रेक्सची गरज असतांना फक्त १५ ते १६ रेक्स मिळत आहे. महानिर्मितीच्या खापरखेडा,पारस,भुसावळ केंद्रात केवळ एक ते अर्ध्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे.

इंडिया बुल्सकडून कोळशा अभावी २७० मेगावॅट वीज कमी मिळत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.गॅसच्या उपलब्धतेची अडचण आहे. गॅस अभावी १,९५० मेगावॅट रत्नागिरी गॅस प्रकल्प बंद आहे. उरण गॅस केंद्रात १५० मेगावॅट वीज निर्मिती कमी झाली आहे.अदानी प्रकल्पातून सुमारे २,५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना वेगवेगळ्या कारणांमुळे १,५०० ते १,७०० मेगावॅट वीज मिळत आहे. याशिवाय हवामानातील अनिश्चिततेचा फटकाही बसला असुन केवळ १५ दिवसात विजेची मागणी एक ते दीड हजार मेगावॅटची वाढ झाल्याने मागणी व पुरवठ्यांचा मेळ बसवण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे भारनियमन होत असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

केंद्रीय पॉवर ग्रीडमधून विजेचा पुरवठा
मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण केंद्रीय पॉवर ग्रीडमधून रोज सुमारे एक ते १,४०० मे.वॅ.वीज घेत आहे. निविदा प्रक्रियेतून ३०० मे.वॅ.विजेची व्यवस्था केली आहे. उरण गॅस केंद्राला बाजारातून गॅस उपलब्ध करून देण्यासाठीही महावितरण प्रयत्नशील असून त्यामुळे १०० ते १५० मे.वॅ.जादा वीज उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहे.

मागणीत मोठी वाढ
राज्यात १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १४,५०० ते १५,५०० मेगावॅटच्या दरम्यान होती. सध्या १६,५०० ते १६,८०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी या काळात मागणी १२,२०० मे.वॅ.होती.सध्याची मागणी तब्बल ४,६०० मेगावॅटने म्हणजे २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.