आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत फराळाच्या पदार्थांवर ‘संक्रांत’, राेज 4 तास गिरण्या राहतात बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू असतानाच गृहिणींच्या उत्साहावर वीज वितरण कंपनीने विरजण फिरविले अाहे. दळण दळण्यापासून घरातील मिक्सर लावण्यापर्यंतच्या सर्वच बाबी विजेवर अवलंबून असतात. राेजच्या चार तासांच्या भारनिमयनामुळे या कामालाच ब्रेक बसत अाहे. 
 
एेन सणासुदीच्या काळातील या भारनियमानाने गृहिणी कमालीच्या त्रस्त अाहेत. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्याचा प्रारंभ दळण दळण्यापासून हाेताे. परंतु, भारनियमनामुळे एक तर गिरणी बंद असते अाणि वीज येईपर्यंत गिरणीतील गर्दी इतकी वाढते की गृहिणींना तासन‌्तास ताटकळत उभे राहावे लागते. दुसरीकडे, गिरणीचालकही या भारनियमनामुळे वैतागले अाहेत. 
 
गिरणीत येणाऱ्या ग्राहकांची गैरसाेय 
सणासुदीच्या काळात तासन‌्तास वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने ग्राहकांची गैरसाेय हाेत अाहे. शिवाय, गिरणीत गर्दीही वाढत असून ग्राहकांना दळणासाठी माेठी प्रतीक्षा करावी लागत अाहे. भारनियमन तातडीने रद्द करावे. 
- तुषार वझरे, संचालक, ममता फ्लाेअर मिल, गंगापूरराेड
बातम्या आणखी आहेत...