आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागलाण तालुक्यात गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त, सहित्य व रसायन जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सटाणा- बागलाण तालुक्यातील कंधाने येथील तरुणांनी एकत्र येऊन शुक्रवारी दुपारी परिसरातील गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त केले. त्याचबरोबर दारू बनविण्याचे सहित्य व रसायन मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे.

गावठी दारू बनविणारे व विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करूनही याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.

सरपंचाच्या शेतात सुरु होता गोरखधंदा...
विशेष म्हणजे कंधाने येथील सरपंचाच्या शेतातच गावठी दारू बनविण्याचे साहित्य मोठया प्रमाणात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सरपंचावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 मागील काही दिवसांत दारू बंदीसाठी गावकऱ्यांकडून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला होता. या संदर्भात पोलिस प्रशासनला वारंवार निवेदन देण्यात आले आहेत. मात्र, पोलिस या गंभीर समस्येकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा गावकर्‍यांनी आरोप केला आहे. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने तरुणांनी कायदा हातात घेऊन ही मोहीम राबवली.
बातम्या आणखी आहेत...