आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेमुळे पंचवटीत आणखी दोन महिने अंधार, परिसरातील 275 पथदीप बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पावसाळा संपत आला तरीही पंचवटीतील नागरिकांना पथदीप बंद असल्याने अंधारातच मार्ग काढावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने किमान दोन महिने तरी पंचवटीकरांना अंधाराचा सामना करावा लागणार असल्याचे निदर्शनास येत आहे. पथदीप बंद असल्याने अपघातांतही वाढ झाली आहे.
पंचवटीमधील बहुतांश प्रभागात पथदीप बंद असल्याच्या पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तक्रारी वाढल्या होत्या. पावसाळा संपत आला तरीही बहुसंख्य पथदीप अजूनही बंद अवस्थेतच आहेत. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे पथदीप सुरू करण्याची मागणी केली होती. प्रशासनाकडून मात्र एलईडीच्या नावे नगरसेवकांची बोळवण केली गेली. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी पथदीपांवर एलईडी दिवे लागण्याचे आश्वासन पालिकेच्या विद्युत विभागाकडून देण्यात आले होते. महापौर निवडणुकीनंतर काही तासांत विधानसभेसाठी आचारसंहिता लागू झाली. यामुळे किमान तीन महिने तरी हे काम प्रलंबित राहणार आहे.

नागरिकांनी याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून पथदीप बंदच्या तक्रारी दिल्या, मात्र नेहमीच एलईडीचे नाव पुढे करून या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांसह नागरिकांना ह्यअंधारातह्ण ठेवले असल्याने आगामी निवडणुकीत नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. विद्युत विभागाचे अभियंता श्याम वाईकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.