आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवितहानी टाळल्याने दुरांतो चालकांचा रेल्वे बोर्डातर्फे गौरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आसनगाव आणि वाशिंद रेल्वेस्थानकांदरम्यान मंगळवारी (दि. २९ आॅगस्ट) सकाळी ६ वाजता दरड कोसळल्याने नागपूर छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे घसरले. मात्र, तत्पूर्वी ही परिस्थिती गांभीर्याने हाताळणारे चालक विजेंद्रसिंग यांनी ताशी १११ स्पीड असूनही तातडीने ब्रेक लावत मोठ्या अपघातातून प्रवाशांना वाचवले. 

या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी मुख्य चालक विजेंद्रसिंग आणि सहायक चालक अभयकुमार पाल यांचा प्रमाणपत्र आणि अनुक्रमे रोख दहा हजार व पाच हजार रुपये देऊन दिल्ली येथे गौरव केला.
बातम्या आणखी आहेत...