आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासिकांना सवलत, पाेटभाडेकरूंवर नाैबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाममात्रदराने मिळकती घेऊन त्याचा व्यावसायिक वापर करण्याच्या प्रकारांना चाप लावला जाईल. तसेच पाेटभाडेकरूच्या माध्यमातून नफा मिळवणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावरही कठाेर कारवाई केली जाईल, असे अादेश महापाैर अशाेक मुर्तडक यांनी साेमवारी ( दि. ८) महासभेतदिले. दरम्यान, महासभेत ‘िव्य मराठी’ने तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने मिळकत धाेरण ठरवताना अभ्यासिका, व्यायामशाळा, वाचनालय यांना सवलतीत मिळकती देण्याचा ठराव करण्यात अाला. अभ्यासिकांवरील कारवाई मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात ठाेस भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांकडे जबाबदारी देण्याची मागणीही करण्यात अाली.
‘दिव्य मराठी’ने पालिकेच्या काेट्यवधी रुपयांच्या मिळकती नाममात्र भाड्याने दिल्या जात असल्याकडे विशेष वृत्त मालिकेद्वारे लक्ष वेधले हाेते. उच्च न्यायालयानेही ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बाळासाहेब चाैधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना नगरसेविका सीमा हिरे यांची अभ्यासिका सील करण्याचे अादेशदिले हाेते. त्यानंतर पालिकेच्या सर्व मिळकत नाममात्र भाड्याने कशा दिल्या या मुद्याची माहिती न्यायालयाने मागवली हाेती. दुसरीकडे तत्कालीन महापाैर अॅड. यतिन वाघ यांनीही मिळकत धाेरण ठरवण्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेसाठी ठेवला हाेता. तब्बल तीन वेळा प्रस्ताव तहकूब ठेवल्यानंतर साेमवारी त्यावर अखेर चर्चा झाली. प्रथम वेळेअभावी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी गटनेत्यांकडून झाली. मात्र, महापाैरांनी महत्त्वाचा प्रस्ताव असल्यामुळे चर्चा करून निर्णय घेण्याचा अाग्रह कायम ठेवला. दरम्यान, सभागृहाची भावना लक्षात घेता, उच्च न्यायालयाकडे लिखित स्वरूपात माहिती कळवली जाईल असे अायुक्तांनी सांगितले. समाजाेपयाेगी वस्तूंचा पारदर्शकपणे वापर झाला पाहिजे. नवीन नियमावली करताना अटीशर्तींचा स्पष्ट उल्लेख केला जाईल असेही स्पष्ट केले. ज्या मिळकतींचा व्यावसायिक वापर हाेत अाहे त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल असे महापाैरांनी सांगितले.
‘पालिकेचे गाळे पाेटभाडेकरूंच्या ताब्यात’ हे वृत्त असलेला ‘दिव्य मराठी’चा अंक महासभेत झळकवताना नगरसेवक प्रा. कृणाल वाघ.

मिळकतींबाबतचे धाेरण ठरविण्याबाबत साेमवारी महासभेत चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा सुरू असताना बऱ्याचशा नगरसेवकांनी सभागृह साेडले. परंतु, मान्यवर २२ नगरसेवकांनी या विषयावर चर्चा रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवली.