आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nashik, Chhagan Bhujbal, Vijay Pandhare

नाशिकमधील तिघे प्रचारक बनले ‘स्टार’, निवडणूक आयोगाच्या यादीत समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनतेमध्ये असलेली लोकप्रियता आणि पक्षातील दबदबा या जोरावर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची नावे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्यात नाशिकमधील छगन भुजबळ, वसंत गिते आणि विजय पांढरे यांचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांच्या सभा नाशिकसह मतदारसंघाबाहेरही होणार आहेत. यंदा मात्र या यादीत चित्रपट कलावंतांना फारसे स्थान नाही.


छगन भुजबळ : शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश, मंडल आयोग, किणी प्रकरणी सेनेवर केलेली टीका, मराठा आरक्षणाचा वाद, प्रॉपर्टी आणि शैक्षणिक संस्थेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे नेहमीच वादात राहिले आहेत. ओबीसी नेते, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट संघटक म्हणूनही ओळख आहे. या विधायक बाबींमुळेच भुजबळ यांची वर्णी स्टार प्रचारकांमध्ये.