आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nashik, Divya Marathi

अर्ज अवैधतेचे टेन्शन संपले;नाशिकचे पाच, दिंडोरीचे चार अर्ज बाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणुकीत आपल्या अर्जात काही चूक तर राहिली नाही ना? ही धास्ती उमेदवारांना अर्ज छाननीपर्यंत असते. ती सोमवारी संपली.नाशिकमध्येही दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात नाशिक मतदारसंघासाठी आलेल्या 29 उमेदवारांच्या अर्जांपैकी पाच अर्ज बाद झाले असून, 24 अर्ज शिल्लक आहेत. तर, दिंडोरीसाठी आलेल्या 15 उमेदवारांच्या अर्जांपैकी चार बाद झाले असून, 11 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. शनिवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर लक्ष लागून असलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणे सर्वच प्रमुख राजकीय उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. काही उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेत ते बाद करण्याची मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली. त्यामुळे काही प्रमाणात उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या. काही किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया 11 ते 3 या वेळेत सुरळीत पार पडली.
.म्हणून अवैध ठरले
उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी पार पडली. या छाननीत बहुतांशी उमेदवारांचे अर्ज डमी असल्यानेच त्यांच्या मूळ उमेदवाराचे अर्ज स्वीकारत डमी अर्ज बाद ठरले. त्यात शशिकांत जाधव आणि श्रीधर देशपांडे, नाशिक; तर कलावती चव्हाण, दिंडोरी यांच्या अर्जाचा समावेश आहे. त्याचबरोबर काही उमेदवारांनी अर्ज भरताना नमूद केलेल्या सूचकांची नावे मतदारसंघात असणे आवश्यक असताना इतरांनी ते सादर केले नसल्याने, तर गोलवड या उमेदवाराने सूचक दिंडोरी अन् अर्ज नाशिकसाठी भरल्याने अर्ज रद्द करण्यात आला. काहींनी पूर्ण अर्ज भरले नसल्याने, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.
अपक्ष उमेदवार
अजित भिका पवार, कैलास मोरे, अभिजित गायकवाड, शकुंतला मोरे या सर्वांनी अपक्ष अर्ज भरले.
अरुण काळे, अनिल गांगुर्डे, दिनकर नामदेव पाटील, नितीन भुजबळ, प्रकाश कनोजे, प्रमोद नाथेकर, बबन फसाळे, विजय भालेराव, मकसूद इलियास खान, किरण मोहिते, राधाकिशन देसाराम धनजल, विष्णू जाधव, विष्णू रामा खाडे, देवीदास सरकटे, मुशीर सय्यद.
नाशिक मतदारसंघ :
शशिकांत जाधव, श्रीधर देशपांडे, निवृत्ती चौरे, मुलानी मुस्ताक करीम, संदीप डोळस
दिंडोरी मतदारसंघ :
किरण गोलवड, सुभाष चौधरी, कलावती चव्हाण, विष्णू कराते