आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nashik Lok Sabha Constituncy, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: लोकसभेची जागा राखण्‍यासाठी पवार काका-पुतण्याचे दिंडोरीत प्रेस्टिज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बारामतीनंतर राष्‍ट्रवादीसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानल्या जाणा-या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा दोन वेळा पक्षांतर्गत गटबाजीमुळे गमावल्याचे लक्षात घेऊन आता शरद पवार यांनीच ही जागा राखण्यासाठी प्रेस्टिज केल्याचे समजते. त्यामुळेच की काय, 20 मार्चला अखेरच्या टप्प्यात शरद पवार स्वत: दोन, तर त्यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन सभा होणार आहेत.


दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्‍ट्रवादीचे वर्चस्व असूनही भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे दोन वेळा निवडून आले. राष्‍ट्रवादीतील गटबाजीमुळे चव्हाण यांना रसद मिळाल्याचे लपून राहिले नाही. पराभवामुळे राष्‍ट्रवादीची ताकद कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर यंदा पवार यांनीच दिंडोरीत लक्ष घातले. या वेळी पराभव झाला तर विधानसभेच्या इच्छुकांना किंवा विद्यमानांना दणका मिळेल, असाही संदेश दिल्यानंतर आता सर्वच प्रचारात उतरल्याचे चित्र आहे.


अशा आहेत सभा
20 तारखेला शरद पवार यांची 11 वाजता पिंपळगावला, तर दुपारी 2 वाजता चांदवड येथे सभा होईल. तर, अजित पवार यांची नांदगाव व कळवण येथे सभा होईल. 18 तारखेला मनमाडला नबाव मलिक यांची दुपारी 3 ला, तर मधुकर पिचड यांची आदिवासीबहुल भागात 18 ते 22 यादरम्यान सभा होतील.


सोनिया गांधी, पवारांच्या सभेसाठी मुहूर्त सापडेना
20 एप्रिलला चांदवड व पिंपळगाव बसवंत येथे शरद पवार यांच्या दोन सभा होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पवार यांची नाशिकला सभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, पवार यांच्या सोयीची वेळ मिळत नसल्यामुळे अद्याप त्याबाबत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे सोनिया गांधी यांची सभा जवळपास होणार नाही, हे निश्चित झाले आहे. मात्र, अद्याप त्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. सोनिया या स्वत:च्याच प्रचारात अडकल्यामुळे नाशिकला कितपत वेळ देतील, याबाबत साशंकताच आहे.