आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Propoganda, Nashik, Divya Marathi

Election:उमेदवार छोटे; प्रचाराचे फंडे मात्र मोठे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवारांनी एकमेकांसमोर शड्ड ठोकले असताना अपक्ष उमेदवारही आपापल्या परीने प्रचार करीत आहेत. यातील काहींनी आपले जाहीरनामेदेखील तयार केले आहेत. हे उमेदवार दिग्गजांच्या तुलनेने छोटे असले तरीही त्यांचे ‘कारनामे’ मात्र मोठे आहेत.


निशाणी नारळ, मलाच द्या ‘बळ’
तिळभांडेश्वर लेन येथे इस्त्रीचे दुकान असलेले प्रकाश कनोजे यांना नारळ ही निशाणी मिळाली आहे. त्यांच्याकडे फारसे कार्यकर्ते नसल्यामुळे ‘एकटा जीव सदाशिव’ म्हणतच ते प्रचार करीत आहेत. त्यांनी टोपलीवर नारळाच्या शेंड्यांपासून मोठे नारळ तयार केले आहे. आपल्या अँक्टीव्हाला लाऊन ही स्वारी प्रचाराला निघते. प्रचाराचे मुद्देही कोणते. तर म्हणे बालमजुरी कायदाच रद्द करा. चित्रपटात बालकलाकारांना तुम्ही प्रोत्साहन देतात आणि जी मुलं पोटासाठी काम करतात त्यांच्या रोजगारावरच तुम्ही पाय देतात.. प्रकाशचं म्हणनं कुणी ऐको न ऐको ते आपले मुद्दे सांगून मोकळे होतात. इतकच नाही तर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी लिहून दिलेय की, काम केले नाही तर मी पदाचा राजीनामा देईन !


पुढे वाचा कोण आले.... तर चिल्लरवाले बाबा....