आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Rally, Divya Marathi

गाडी, जेवण नको, पैसे द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - लोकसभा निवडणुकीत शक्ति- प्रदर्शनासाठी प्रत्येक उमेदवाराला बाहेरून माणसे बोलवावी लागत आहेत. मात्र, यामुळे या भाडोत्री माणसांचा भाव वधारला आहे. या लोकांना गाडी, जेवण नको आहे, तर प्रचाराला निघण्यापूर्वीच त्यांच्याकडून 500 रुपयांची मागणी होत आहे.


प्रचार फेरी, रॅलीसह ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत. मेळावे, रॅलीत सर्मथकांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने कार्यकर्ते उमेदवारांचा डोळा चुकवून पळ काढतात. त्यामुळे उमेदवारांना बाहेरील माणसे आणावी लागतात. नाशिकरोड येथे झोपडपट्टय़ांची संख्या सर्वाधिक आहे. येथील नागरिक पक्ष, उमेदवार कुठलाही असला तरी रोजगाराची संधी साधत मेळावे, रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी रोख 500 रुपयांची मागणी करत आहेत.


नुकताच एका राजकीय पक्षाचा नेता जेलरोडच्या इंदिरा गांधी झोपडपट्टीतील नागरिकांना मेळाव्यासाठी घेऊन जाण्यासाठी आला. त्याने 200 रुपये रोख, जेवण व येण्या-जाण्यासाठी गाडीचे आमिष दाखविले. मात्र, महिला व पुरुषांनी हे सगळे नाकारत आधी 500 रुपये रोख द्या, अशी मागणी केली. 200 रुपयांवरून हे लोक थेट 500 रुपयांवर आले असल्याचे उमेदवारांनीही मान्य केले.


नंतर पैसे मिळत नाही
प्रचार झाल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होते. वाद टाळण्यासाठी अगोदर पैसे घेतो. निवडणुकीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. पार्वताबाई, प्रचारफेरीतील महिला