आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Rally, Election Commission Of India

सभा, रॅलीची परवानगी घेतानाच खर्चाचे नियोजन द्या, केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यातील तिसर्‍या टप्प्यात 24 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे मोठे नेते, स्टार प्रचारक नाशिकमध्ये येण्याची शक्यता असल्याने आता सभा, रॅलीची परवानगी घेतानाच संबंधितांकडून खर्चाचे नियोजन घ्या, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केल्या आहेत.आतापर्यंत घेण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये उमेदवारांनी खर्चाची कुठलीही माहिती अथवा अंदाज दिला नाही. त्यामुळे योग्य तपासणी करता येत नसून, आता खर्च किती होणार, याचे सादरीकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे भरारी पथके आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमलाही योग्य नियंत्रण ठेवता येईल.

आता स्टार प्रचारकांच्या सभा होणार असल्याने अधिक काटोकोरपणे त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वाढली असून, त्याबाबत नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघाचे निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व पोलिस आयुक्तांसह सर्वच अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले. कुठलीही रोकड पकडल्यास त्वरित ती केस निकाली काढावी. आयकर विभागाची मदत घेण्याचेही सांगण्यात आले. वाहन तपासणीचे नाकेही बदलत राहण्याच्या सूचनाही या वेळी करण्यात आल्या. जिल्ह्याच्या सीमांवर 12 पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके त्यावर नियंत्रण ठेवणार असल्याने बाहेरील प्रवृत्तींना आळा बसणार आहे.