आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Social Media, Application, Divya Marathi

सोशल मीडिया: मतदानाची आता माहिती अँप्सवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अँप स्टोअरवर फक्त इलेक्शन किंवा इलेक्शन इंडिया सर्च केल्यास, देशाच्या प्रत्येक प्रांतातील निवडणुकीची माहिती देणारे अँल्पिकेशन पाहायला मिळतात. त्यात मतदार नोंदणी आणि मतदानाविषयीची जागृतीची माहितीही मिळते.


मोबाइल अँप्लिकेशनमध्ये मतदानास पात्र होण्यासाठी कोणत्या अटी आहेत, येथून ते मतदार यादीत आपले नाव शोधण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. काही अँप्लिकेशन हे एखाद्या विशिष्ट प्रदेशाच्या निवडणुकांची माहिती देणारे आहेत. जसे गुजरात इलेक्शन, बिहार वोटिंग आदी. आपल्या प्रभागातील मतदान केंद्रे, त्याचा पत्ता, त्याची थेट जागा आपल्याला काही अँप्लिकेशनद्वारे गुगल मॅपमध्ये पाहता येतील. या सगळ्या अँपमध्ये केंद्रनिहाय मतदारयाद्या पाहता येणार आहेत.


इलेक्शन इंडिया वोट
सर्च की : इलेक्शन, इंडिया वोट, इलेक्शन इंडिया
वैशिष्ट्ये : यात यादीनिहाय नाव शोधता येणार आहे. मतदान केंद्राचा पत्ता गुगल मॅपद्वारे शोधता येईल, नावनोंदणी न केलेल्यांसाठी माहिती, नाव, पत्त्यातील चुका सुधारण्यासाठी पर्याय.