आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Elections, Latest News In Divya Marathi

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-गत लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बी. डी. भालेकर हायस्कूलच्या केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी आमनेसामने येऊन भिडले होते. यामुळे तणाव निर्माण होऊन झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसह पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गैरप्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित 15हून अधिक जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
23 एप्रिल 2009 या दिवशी नाशिक लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्रावर मतदान सुरूच होते, ते बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांत भिडल्याने पळापळ होऊन तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला, तरीही पदाधिकारी बाहेर पडत नसल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी उमेदवारांसह प्रमुख पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांकडून यंदाच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 300 हून अधिक कार्यकर्त्यांना केंद्रीय फौजदारी संहितेनुसार 111 प्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार, मंगळवारी राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही पदाधिकारी सहायक पोलिस आयुक्त परिमंडळ एक कार्यालयात हजर झाले होते. उर्वरित पदाधिकार्‍यांना आठवडाभराच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत.