आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांब पल्ल्याच्या १३ रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - इटारसी स्थानकावरील सिग्नल पॅनल कॅबिनला लागलेली अाग मुंबई उपनगरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर अाली असली, तरी उशिराने पाेहोचलेल्या गाड्या त्यांच्या सुटण्याच्या वेळा पाळू शकत नसल्याने साेमवारी दाेन्ही बाजूच्या लांब पल्ल्याच्या १३ गाड्या रद्द करण्यात अाल्या.

मात्र, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पंचवटी, गाेदावरी, राज्यराणी, भुसावळ-पुणे या गाड्या त्यांच्या नियाेजित वेळेनुसार धावल्याने कामगार, व्यावसायिक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मुंबईतील पावसामुळे १८ जूनपासून मध्य रेल्वेची विस्कळीत वाहतूक साेमवारी पूर्वपदावर अाली.

मार्ग बदललेल्या त्यांच्या मार्गावरून धावण्यास सुरुवात झाली. मात्र, नैसर्गिक अडचणीमुळे रद्द झालेल्या उशिराने पाेहोचलेल्या गाड्या त्याच्या वेळा पाळू शकत नसल्याने मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेस, पटना सुपर, फैजाबाद एक्स्प्रेस, लखनाै सुपर, कामायनी एक्स्प्रेस, तपाेवन, कुशीनगर अमृतसर एक्स्प्रेस रद्द करण्यात अाल्या.

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यापैंकी गाेदान सव्वा तास, काशी दाेन तास, लखनाै मुंबई स्पेशल पाच तास, तर पुष्पक चार तास उशिराने धावत हाेती. भुसावळकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी बरेली एक्स्प्रेस, फैजाबाद एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर,नंदिग्राम गाेदान या गाड्या रद्द करण्यात अाल्या हाेत्या, तर पुष्पक एक्स्प्रेस अाठ तास, पवन कामायनी एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे उशिराने धावत हाेत्या. गाड्यांच्या वेळा बदलल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
बातम्या आणखी आहेत...