आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Long Route Railway's Management Form Deolali Station

रेल्वेगाड्यांची देवळालीत देखभाल, सिंहस्थ कुंभमेळ्यात विशेष व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिंहस्थात देशाच्या वेगवेगळ्या स्थानकांवरून सोडण्यात येणाऱ्या स्पेशल लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या देखभालीची व्यवस्था देवळाली कॅम्प स्थानकावरून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकरोडला प्रवासी उतरल्यानंतर या गाड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था देवळालीला करण्यात आली आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वरला भरणारा कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रेल्वे
प्रशासनाकडून व्यवस्थेचे अंतिम नियोजन केले जात आहे. सिंहस्थात ठिकठिकाणावरून नाशिकला २२ स्पेशल लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मुक्कामासाठी देवळाली स्थानकावर असणार आहे. तेथेच त्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच गाडीत पाणी भरण्यात येणार असल्याने देवळालीला गुरुवारी बोअरवेल खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने रेल्वेची गाड्यांसाठीची पाण्याची अडचण दूर झाली आहे.
एकाकोचला तीन हजार लिटर पाणी : सूत्रांच्या माहितीनुसार गाडीच्या एका कोचला तीन हजार लिटर पाण्याची गरज असते, त्यानुसार १७ ते १८ कोचला पुरेल इतके पाणी देवळालीत उपलब्ध आहे. याशिवाय देवळाली मालधक्क्यावर सुमारे ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवण्यात येणार आहे. गाडीत पाणी भरण्याची व्यवस्था देवळालीच्या तिसऱ्या लाइनवर करण्यात आली असून, तेथे पाइप फिटिंगचे काम हाती घेण्यात आले आहे.

अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा
देशभरातूनयेणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भाविक, प्रवासी नाशिकरोड स्थानकावर उतरवल्यानंतर गाड्या मुक्कामासाठी देवळालीत थांबणार आहेत. परतीच्या भाविकांची मालधक्का, नाशिकरोड ओढा स्थानकावर गर्दी झाल्यानंतर देवळालीतून गाडी नाशिकरोडला सोडण्यात येणार आहे. देवळालीत मुक्कामी गाड्यांव्यतिरिक्त किमान चार रॅक उपलब्ध ठेवले जाणार असल्याने गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था होणार आहे.