आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मंगलमूर्ती माेरया’च्या घाेषात गणरायाचे अागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘गणपती बाप्पा माेरया, मंगलमूर्ती माेरया’ अशा गगनभेदी घाेषणा देत बुद्धीची देवता समजल्या जाणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाची वाजतगाजत विविध सार्वजनिक मंडळांसह घराघरांत माेठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात अाली. त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली अाहे. यंदाच्या गणेशोत्सवात बच्चेकंपनीसह महिलांचा उत्साह अधिक दिसून अाला. शहरासह उपनगरांमध्ये ढाेल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात अाली. काही ठिकाणी लेझीम पथक, तर काही मंडळांनी महिला ढाेल पथकाच्या निनादात ‘श्रीं’ची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली.

गणरायाच्या आगमनाची शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या मंडळांसह घरोघरी तयारी करण्यात आली होती. विविध गणेश मंडळांतर्फे ढोल-ताशांच्या गजरात माेठ्या उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी वाजतगाजत मानवी मनाेरे तयार करण्यात येत हाेते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी विविध गणेश मंडळांनी भव्य देखावे साकारण्याची तयारी चालविली अाहे. तसेच, घरच्या गणपती बाप्पासाठी बच्चेकंपनीनेही घरात अाकर्षक सजावट करून बुद्धीच्या देवतेची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली. बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी शहरातील ईदगाह मैदान, मेनरोड, कॉलेजरोड, द्वारका, नासर्डी पूल, सिडको, सातपूर परिसरात श्रींची मूर्ती पूजेचे साहित्य घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली हाेती. नागरिकांची ही गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. या वर्षी पर्यावरणपूरक असलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यास नागरिकांनी अधिक पसंती दिली. गणपती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी साेमवारी दिवसभराचा मुहूर्त असला तरी अनेक नागरिकांनी पंचांगानुसार दुपारी १.४५ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर भर दिला. तसेच, सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी उशिरापर्यंत प्रतिष्ठापना केली. सायंकाळनंतर शहरात सर्वत्र गणरायाची गाणी वाजत असल्याने मंगलमय वातावरणात चैतन्य निर्माण झाले हाेते. पहिल्या दिवसअखेर अनेक गणेश मंडळांकडून देखाव्याचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात हाेता.

नाशिकरोड दीडशे मंगळांकडून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
नाशिकरोडपरिसरात सोमवारी सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी जल्लोष सुरू होता. त्यामुळे बिटको पॉइंट परिसरात गणेशभक्तांची गर्दी झाली होती. ही गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती, तर पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त दिसून येत होता. नाशिकरोड, जेलरोड परिसरात सुमारे दीडशे मंडळांनी गणपती बाप्पा बसविले आहेत. मात्र, यावेळी मंडळांनी डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. जी मंडळे ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज ठेवतील त्यांना शिक्षा होऊ शकते. नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, देवळालीगाव, लामरोड, विहितगाव, जय भवानीरोड, आंबेडकरनगर, शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे आज सर्वत्र गणेशगीतांनी देवळालीत५० मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना
गणेशचतुर्थी गणेशउत्सवाला प्रारंभ झाला असून देवळालीत घराघराे तसेच सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केली. देवळाली कॅम्प शहरात ५० ,भगूर २० ग्रामीण भागात २५ तर सर्व मिळून ९५ आणि मौल्यवान अशी एकूण १०३ मंडळीनी नोंदणी केली असून या साठी पोलिसांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आलं असून उत्सव काळात कसला हि अनुचित प्रकार घडूनये या साठी पोईस प्रशासन समाज झाले आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांनी साधली संधी
अागामी महापालिका निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर शुभेच्छा फलकांद्वारे स्वत:ची छबी झळकविण्याचा प्रयत्न केला. सिडकाेतील सिटी सेंटर माॅलच्या परिसरापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत माेठ्या प्रमाणात हाेर्डिंग उभारण्यात अाले अाहेत. तसेच, शहरातील विविध चाैकांमध्येही अनेकांनी विनापरवानगी हाेर्डिंग उभारून संधी साधली.

अनेक ठिकाणी वाहतुकीत अडथळा
गणेशमूर्ती घेण्यासाठी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे मूर्ती विक्रेत्यांच्या स्टाॅलवर येत असल्याने शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण हाेत हाेते. पाेलिस वाहतूक सुरळीत करत होते.
बातम्या आणखी आहेत...