आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती विक्रेत्यांना मोक्याच्या जागेवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दरवर्षी मोक्याच्या रस्त्यांवर स्टाॅल थाटून गणेशमूर्ती विक्रीवरून होत असलेला वाद, शांतता क्षेत्राचे होणारे उल्लंघन महापालिका-पोलिसांमध्ये रंगणारा संघर्ष यंदा कुंभमेळ्यामुळे थांबणार आहे. यंदा महत्त्वाच्या मार्गांचा भाविकांसाठी उपयोग केला जाणार असल्यामुळे अशा ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांना बंदी घातली जाणार आहे. संबंधितांना पर्यायी जागा कोठे द्यायची, याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना चाचपणीचे आदेश दिल्याचे उपायुक्त रोहदिास बहिरम यांनी सांगितले.

गणेशोत्सवापूर्वी पंधरा दविस आधी शहरात गणेशमूर्ती विक्रेत्यांकडून स्टाॅल थाटले जातात. या स्टाॅलची जागा निश्चिती भाडे आकारणी लिलाव पद्धतीने पालिका करते. तत्पूर्वी अशा जागांमुळे वाहतूक कोंडी वा शांतता क्षेत्राचा भंग होणार नाही ना, याविषयी पोलिसांकडून अभिप्राय घेतला जातो. गेल्या वर्षी पोलिस पालिका यांच्यात त्र्यंबकरोडवर गाळे उभारण्यावरून वाद रंगला होता. यात गणेशमूर्ती विक्रेत्यांची संघटना भारी पडल्याने स्टाॅलला परवानगी द्यावी लागली होती. यंदा मात्र कुंभमेळ्यामुळे मोक्याचे अनेक रस्ते भाविकांसाठी खुले ठेवले जाणार असल्याने तेथे स्टाॅलला परवानगी मिळणार नाही.

यारस्त्यांवर बंदी : नाशिकरोडलाबिटको पाॅइंट, जेलरोड, द्वारकेजवळ पौर्णिमा स्टाॅप, सिडको, सातपूर, दिंडोरीरोड, आरटीओ काॅर्नर, डोंगरे वसतिगृह (वाहनतळासाठी आरक्षित).
बातम्या आणखी आहेत...