आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने ईव्हिम मशीनमध्‍ये घोळ केला, पराभूत उमेदवारांचा आरोप; न्‍यायालयात जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ नाशिक/ नागपूर - राज्यभरातील महापालिकांमध्ये भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर विराेधी पक्षांकडून शंका उपस्थित केल्या जात अाहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच त्यांना हे यश मिळाल्याचा अाराेप करत पुणे, नाशिक व नागपूरमधील पराभूत उमेदवारांनी अाता थेट न्यायालयाचे दरवाजे ठाेठावण्याचा निर्णय घेतला अाहे. याविराेधात नाशिकमध्ये तीन मार्चला तर पुण्यात २८ फेब्रुवारीला अांदाेलन करण्यात येणार अाहे. 
 
पुण्यातही रविवारी पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना आदी राजकीय पक्षांचे अनेक पराभूत झालेले उमेदवार उपस्थित होते. त्यात दत्ता बहिरट, माजी आमदार बापू पठारे, बंडू केमसे, अर्चना कांबळे, सुनील गोगले, सचिन भगत, रूपाली ठोंबरे पाटील, धनंजय जाधव, मंदार बलकवडे, नीलेश कदम, ऐश्वर्या जाधव, वैशाली चांदणे, बाळासाहेब बोडके आदींचा समावेश होता. ‘भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकला असून ईव्हीएममध्ये घोटाळे केले आहेत. अन्यथा इतकी वर्षे समाजात कार्यरत असूनही आमचा पराभव कसा झाला आणि भाजपचे इतके उमेदवार एकदम कसे निवडून आले?’ असा सवाल या पराभूत उमेदवारांनी केला. 
 
नाशिकमधील अाक्षेप:  ईव्हीएमचे सील अाधीच काढलेले हाेते, काही मशीन्स चालूच ठेवून ती पेटीत बंद करण्यात अाली हाेती, मतदारांची नावे इकडूनची तिकडे टाकण्यामागे ‘माेफत’ मिळालेल्या एका कार्ड कंपनीचा अाणि भाजपचा हात असल्याचा अाराेपही नाशिकमधील एका पराभूत उमेदवाराने केला. तर काही मतदारांनी महापालिका अाणि जिल्हा परिषदांमध्येही मतदान केले असून त्याचे पुरावे असल्याचे दावेही काही उमेदवारांनी केले. सर्व मशीन्सच्या पेट्या या एका ठिकाणी ठेवून त्या लाॅकरूमला सीअारपीएफचा बंदाेबस्त लावणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात साध्या पाेलिसांचा पहारा बंदाेबस्त लावण्यात अाल्याचाही अाक्षेप नाेंदवण्यात अाला.

जुन्याच पद्धतीने मतदान घ्या  
नागपूरमध्ये ईव्हीएममधील घाेळाविराेधात लढा देण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. ही समिती सोमवारी याचिका दाखल करून फेरमतदानाची मागणी करणार अाहे. ‘ईव्हीएम आल्यापासून भाजपचा विजयाचा ग्राफ आश्चर्यकारक वाढत आहे. नितीन गडकरी तब्बल पावणेतीन लाखांनी निवडून आले. जिल्ह्यातून भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत. महापालिकेत चांगली कामगिरी करणारे विराेधी पक्षाचे उमेदवार  पराभूत झाले. हा प्रकार संशयास्पद असून  त्यामुळे जुन्याच बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घ्यावे, अशी मागणीही करण्यात अाली.     
बातम्या आणखी आहेत...