आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या वृद्धांची हाेणार नियाेजनपूर्वक ‘घरवापसी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारवाडी युवा मंचच्या नाशिक झाेनच्या वतीने कुंभमेळ्यात हरविलेल्या वृद्धांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पाेहचविण्याच्या उद्देशाने ‘घरवापसी’ हा प्रकल्प राबविण्यात येणार अाहे. प्रशासनाच्या मदतीने हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मंचतर्फे अायाेजित बैठकीत घेण्यात अाला.
दरबारा वर्षांनी नाशकात भरणाऱ्या कुंभमेळ्यानंतर कुटुंबापासून हरवलेल्या, साेडून दिलेल्या वृद्धांचा प्रश्न निर्माण हाेताे. निराधार वृद्ध नागरिकांची हेळसांड थांबविण्यासाठी मारवाडी मंचने मागील कुंभमेळ्यात अशाच ४२ लाेकांना त्यांच्या घरी पाेहाेचविले हाेते. सदरचा उपक्रम या वेळीही राबविला जाणार अाहे. त्याअंतर्गत चुकलेल्या वृद्धांना भाेजन, वैद्यकीय सेवा देण्यात येऊन बस अथवा रेल्वेने त्यांच्या गावी घरापर्यंत पाेहचविण्यात येणार अाहे.
या प्रकल्पासाठी सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावे, असे अावाहन मारवाडी युवा मंचचे प्रदेश सरचिटणीस सुमित बाेरा यांनी केले अाहे. या बैठकीला नाशिक शाखेचे अध्यक्ष अमित बाेरा, नगरसेवक अाकाश छाजेड, ललित बुब, सचिव नीलेश भंडारी, महिला शाखाध्यक्षा स्मिता बाेरा, सुरेखा कांकरिया, सुनीता भतवाल, निकीता काेठारी, मधु कासट अादी उपस्थित हाेते.