आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डाॅ. गेडाम यांच्या बदलीचे शहरात पडसाद, अाम अादमी पक्षाचे बेमुदत उपाेषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे पडसाद गुरुवारी (दि. ७) दुपारनंतर शहरात उमटले. अाम अादमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमाेर उषाेपण सुरू करण्यात अाले, तर जागरूक नाशिककर समितीच्या वतीने मेहेर सिग्नल परिसरात रास्ता राेकाे करण्यात अाला. साेशल मीडियावरदेखील बदलीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात अाल्या.
सिंहस्थात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे डाॅ. गेडाम हे २०१४ मध्ये नाशिक महापालिकेत रुजू झाले. पालिकेच्या अनागाेंदी कारभाराला त्यांनी वेसण घातली हाेती. पालिकेच्या भ्रष्टाचाराला चाप लावताना लाेकप्रतिनिधींचीही अतिक्रमणे काढण्याचे माेठे काम त्यांनी केले. नाशिकचा समावेश ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले हाेते. ‘कपाट’ प्रकरणावरून गेडाम यांची कारकीर्द अधिक गाजली. एकीकडे गेडाम यांच्या कार्यकुशल कामगिरीचे काैतुक शहरवासीयांकडून हाेत असताना दुसरीकडे त्यांच्या कार्यशैलीवर टीकाही करण्यात अाली. त्यांच्या काही निर्णयांमुळे विकासकामांना खीळ बसली, असे बाेलले गेले. विशेषत: बांधकाम क्षेत्रावर त्याचा अधिक परिणाम झाला हाेता. मराठवाड्याला पाणी साेडण्याच्या प्रकरणातही डाॅ. गेडाम अडचणीत अाले हाेते. पाणीकपात करावी की नाही अाणि ती कधीपासून करावी, या संदर्भात त्यांच्यात अाणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात मतभेद निर्माण झाले हाेते. त्यानंतर पालकमंत्री गेडाम यांच्या बदलीसाठी अाग्रही हाेते, असे बाेलले जाते. यापूर्वीही गेडाम यांच्या बदलीबाबत अफवा पसरल्या हाेत्या. त्यावेळी महासभेत या विषयावर चर्चा झडून लाेकप्रतिनिधींनी डाॅ. गेडाम यांची बाजू घेतली हाेती.

गेडाम यांची मुंबईच्या विक्रीकर सहअायुक्तपदी बदली हाेताच ‘अाप’च्या वतीने या बदलीविराेधात पालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपाेषण सुरू केले. यात जितेंद्र भावेे, जगबीरसिंह, विकास पाटील, विनायक येवले, अभिजित गाेसावी, एकनाथ साबळे, प्रभाकर वायचळे, स्वप्नील घिया अादी सहभागी झाले अाहेत. जागरूक नागरिक समितीच्या वतीने सायंकाळी मेहेर सिग्नलवर रास्ता राेकाे करण्यात अाला. यावेळी ‘कर्तव्यदक्ष अायुक्त नाशिकमध्ये राहिलेच पाहिजे’, ‘अायुक्तांची बदली करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असाे’, अशा घाेषणा देण्यात अाल्या. अांदाेलकांना पाेलिसांनी अटक केली. अांदाेलनात राजू देसले, याेगेश निसाळ, राजपालसिंग शिंदे, माधुरी भदाणे, प्रमिला चाैरे, अाबा थाेरात, अझीझ पठाण, मुख्तार शेख, एकनाथ येवले अादींनी सहभाग घेतला. तत्पूर्वी समितीची बैठक हुतात्मा स्मारकात झाली.

हुतात्मा स्मारकात अाज सायंकाळी बैठक
महापालिकाअायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीसंदर्भात जागरूक नागरिक समितीची शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी वाजता हुतात्मा स्मारकात पुन्हा विस्तृत स्वरूपात बैठक हाेणार असल्याचे राजू देसले यांनी कळविले अाहे.
बातम्या आणखी आहेत...