आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकास वर्षातून १५ दिवस अनुमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षातून १५ दिवस ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक रात्री बारापर्यंत वाजवण्यास पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली असून, केंद्राने या कायद्यात सुधारणा केली अाहे.
या नियमांमध्ये उपनियमानुसार नव्याने समावेश करण्यात आलेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत करण्यात आलेल्या ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृह, सामूहिक सभागृह आणि सार्वजनिक उत्सवांसाठी वर्षातील १५ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत नियम शिथिल करण्यात आला आहे.

ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृह, सामूहिक सभागृह अाणि मेजवानी कक्ष यांखेरीज सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत करता येत नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या अधिसूचनेमध्ये सुधारणा केली आहे. ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित पातळीत ठेवून वर्षातील १५ दिवस ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री बारापर्यंत करता येईल. यातील दाेन दिवस ठरवण्याचे अधिकार राज्य शासनास देण्यात अाले असून, अन्य १३ दिवस केंद्राने ठरवून दिले अाहेत.
या दिवशी परवानगी
शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मे (महाराष्ट्र दिन), गणेशाेत्सवातील चार दिवस ( दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन अनंत चतुर्दशी), नवरात्रोत्सवातील दाेन दिवस (अष्टमी नवमी), लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, ३१ डिसेंबर आणि उर्वरित दोन दिवस राज्य शासनाच्या मान्यतेने महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार दिले जातील.
बातम्या आणखी आहेत...