चांदवड - तालुक्यातील कानडगाव येथील प्रेमीयुगुलाने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. बापू जिभाऊ नेमणार (२२) व स्वाती भाऊसाहेब लगदिरे (२२) अशी मृत प्रेमीयुगलाचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनाही विवाह करायचा होता. मात्र, दोन्ही कुटुंबातील प्रमुखांनी या विवाहास विरोध दर्शविल्याने प्रेमीयुगुलाने कानडगाव शिवारातील चिंतामण लगदिरे यांच्या शेतातील
शेततळ्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यविधीसाठी त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.