आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहात अड‌थळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या काकावर गोळीबार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विवाहास नकार देत अडथळा निर्माण करणाऱ्या प्रेयसीच्या काकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. सुदैवाने यात प्रेयसीचा काका बचावला. पोलिसांनी या प्रकरणी जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले आहे.

सिडकोतील शिवपुरी चौकात राहणाऱ्या संभाजी कडवे याचे त्याच परिसरात राहणाऱ्या महावदि्यालयीन मुलीशी तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. या दोघांनी विवाह करण्याचे निश्चित केले होते. मात्र, मुलीच्या काकाने या विवाहास नकार देत जोरदार विरोध केला होता. सध्या मुलीचे कुटुंबीय आडगाव परिसरात राहतात. तर, मुलीची आत्या सिडकोत शिवपुरी चौकातच राहते. गुरुवारी सायंकाळी मुलीचे लहान काका आत्याच्या घरी आल्याचे समजताच संभाजी कडवे याने तेथे जाऊन त्याच्याजवळील देशी बनावटीच्या (गावठी) पिस्तुलातून एक राउंड काकाच्या दिशेने झाडला घटनास्थळाहून पोबारा केला. सुदैवाने ही गोळी भिंतीवर लागल्याने काका बचावले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संभाजी कडवे याच्याविरुध्द जिवे मारण्याचा आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले.

फोटोः प्रियकराने प्रेयसीच्या काकावर झाडलेल्या गोळीने घराच्या भिंतीला पडलेले छिद्र.