आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेथीला अवघा 1 रुपयाचा भाव; संतप्त शेतकऱ्याने जुड्या फेकल्या रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबे सुकेणे (नाशिक)- मेथीच्या भाजीचे बाजारभाव आज प्रति जुडी एक ते दोन रूपये झाल्याने नाशिक जिल्ह्यातील चांदाेरी परिसरातील एका शेतकऱ्याने सुमारे तीनशे जुड्या रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला.


      मेथीचे भाव सातत्याने कोसळत असुन आज सोमवारी 100 रूपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतकऱ्यांनी आज मेथीच्या जुडया रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला. शेतमालाचे बाजारभाव घसरत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. मेथीची आवक वाढल्याने रविवारपासुन मेथीला नाशिक बाजार समितीत प्रति नग दोन रूपये भाव मिळाल्याचा चांदोरी येथील शेतकरी प्रकाश टलेॅ यांनी सांगितले. त्यामुळे मेथीचा उत्पादन खर्च, वाहतुक, मजुरी ही सुटत नसल्याने प्रकाश टलेॅ यांनी सुमारे तीनशे नाशिक मेथी जुडी रस्त्यावर ओतुन दिले.  किमान पंधरा रूपये प्रति जुडी असा भाव अपेक्षित आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...