आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त भाजीपाला योजना कोमेजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ग्राहकांना माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध होऊन शेतकर्‍यांनाही चांगला मोबदला मिळण्यासाठी कृषी विभागाने सुरू केलेली योजना स्थानिक विक्रेत्यांच्या हस्तक्षेपामुळे कोमेजू लागली आहे. शहरातील 32 पैकी अवघी 12 केंद्रे सुरू आहेत. काही भागांत ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी शेतकर्‍यांनीच माघार घेतली आहे.

फेब्रुवारीपासून ही थेट घरपोच भाजीपाला विक्री योजना इंदिरानगर, काठेगल्ली, गंगापूररोड, कॉलेजरोड, नारायणबापूनगर अशा विविध भागात 32 केंद्रांद्वारे सुरू होती. सद्यस्थितीत त्यातील 12 केंद्रेच सुरू आहेत. अनेक केंद्रांवरील शेतकर्‍यांकडे केवळ दोन-तीन प्रकारचाच भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. प्रतिसादाअभावी शेतकरीही नाखूश असल्याचे दिसते. त्यातच, वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले स्थानिक विक्रेते शेतकर्‍यांना धमक्याही देत आहेत.

शेतकर्‍यांचे 25 गट तयार करणार
योजनेसाठी नाशिक, निफाड, दिंडोरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे शंभर, तर इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमधील 25 गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटाला पाच हेक्टर क्षेत्रात विविध प्रकारचा भाजीपाला पिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. बाळासाहेब मुसमाडे, प्रकल्प उपसंचालक, ‘आत्मा’

गृहनिर्माण सोसायट्यांनी जागा द्यावी
गृहनिर्माण सोसायट्यांनी शेतकर्‍यांना सकाळी व सायंकाळी केवळ दोन तास जागा द्यावी. आम्हाला शहरात 250 भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करायची आहेत. तसेच, बंद असलेली सर्व केंद्रे 15 जुलैपासून पुन्हा खुली होणार आहेत. मधुकर पन्हाळे, जिल्हा कृ षी अधीक्षक