आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅससाठी ‘आधार’ जोडा ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गॅसग्राहकांना बँक किंवा गॅस एजन्सीत न जाता आपला ‘आधार’ क्रमांक लिंक (जोडता) करता येणे आता घरबसल्या सहज शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच मिनिटांत ही प्रक्रिया शक्य असल्याने युआयडी विभागाच्या या संकेतस्थळाला नाशिककरांची उत्तम पसंती मिळत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरसह विविध अनुदानांची रक्कम यापुढे थेट लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. त्याकरिता ‘आधार’ (युनिक आयडेंटीफिकेशन नंबर) क्रमांक बँक खात्याशी जोडणे महत्त्वाचे आहे. ग्राहकाला त्याचा आधार क्रमांक ऑनलाइन नोंदविता यावा, याकरिता केंद्र सरकारच्या ‘युआयडी’ विभागाने ऑनलाइन नोंदणीचा ‘आधार’ घेतला आहे. लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पूर्णपणे पोहोचावे या उद्देशाने केंद्र शासनाने आधार क्रमांक बॅँक खाते आणि गॅस कंपनीशी जोडणे आवश्यक आहे. थेट बँकेत अनुदान या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोनशेवर जिल्ह्यांचा समावेश केला आहे. नाशिक जिल्ह्याचा या योजनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश नसला तरी लवकरच तो होणार असल्याने गॅस कंपनी आणि बँकांशी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.