आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅसची सबसिडीही होणार बँक खात्यात जमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गॅस ग्राहकांचे बॅंक खाते उघडण्यास शासनाने आदेश दिल्याने रॉकेल सबसिडीसोबतच आता गॅस सबसिडीही बॅँक खात्यात जमा होण्याचे स्पष्ट झाले आहे.
रॉकेलमधील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने रॉकेल प्राप्त ग्राहकांची बॅँक खाते उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांचे अनुदान थेट खात्यावरच जमा करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले. त्यानंतर आता गॅस ग्राहकांचीही बॅँक खाते उघडण्याचे आणि त्यांच्या खात्याचे तपशील शासनास सादर करण्याचे आदेश गॅस वितरकांना देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजता गॅस कंपन्यांचे सेल्स अधिकारी, वितरक यांची बैठक आयोजित करणयात आली आहे. त्यामध्ये संबधितांना पुढील कार्यवाही संदर्भात आदेश देण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले आहे.