आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलपीजी वाहनांना ग्राहकांची पसंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: पेट्रोलचे भाव दर महिन्याला वाढतच असल्याने आता डिझेल किंवा एलपीजी सुविधा असलेली वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. थोड्याफार पैशांची बचत करण्याकडेही ग्राहकांचा कल असून, मारूती, शेवर्ले आणि ह्युंदाई कंपनीच्या एलपीजी किटला अधिक पसंती दिली जात आहे. महिन्याकाठी या कंपन्यांची जवळपास 150 एलपीजी वाहने विकली जात आहेत.
पेट्रोलच्या तुलनेत बचत
शहरात एकूण आठ एलपीजी गॅस पंप आहेत. प्रती लिटर एलपीजीकरीता 44 रूपये तर पेट्रोलकरीता 76.54 रूपये मोजावे लागतात. कोणतीही चारचाकी एलपीजीमध्ये किमान 12 किलोमीटर तर पेट्रोल असल्यास 15-16 किलोमीटर चालते. या खर्चाची तुलना केली तर चारचाकीला एलपीजी किट बसविल्यास प्रत्येक किलोमीटरकरीता 4 रूपये आणि पेट्रोलकरीता 4.60 रूपये खर्च लागतो. ज्यांना अधिक लांबचा प्रवास करायचा आहे, त्यांच्या एकूण खर्चात त्यामुळे खूप मोठा फरक पडतो. नाशिक-मुंबई प्रवासाचा विचार केला तरी 180 किलोमीटरकरीता किमान 100 रूपयांची बचत होते.