आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या धडकेनंतर बस पेटली; दाेन ठार, मनमाडजवळील दुर्घटना, 32 प्रवासी बचावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - मनमाड-धुळे महामार्गावर मनमाडपासून सात किमीवरील कुंदलगाव शिवाराजवळ एका खासगी लक्झरी बस व दुचाकीची समाेरासमाेर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकी बसच्या खाली दबली गेली व तिच्या पेट्राेल टाकीचा स्फाेट हाेऊन लागलेल्या अागीत दुचाकीवरील दाेघांचा मृत्यू झाला. या स्फाेटात बसही पूर्णत: जळून गेली. साेमवारी पहाटे हा अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप अाहेत.  
 
रविवारी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास नंदुरबार (प्रकाशा) येथून ओमसाई ट्रॅव्हल्सची स्लिपर काेच बस  (एमएच १८ एपी ८००१) पुण्याकडे निघाली हाेती. त्यात ३२ प्रवासी हाेते. कुंदलगावजवळ एका वळणावर मनमाडहून मालेगावकडे निघालेली दुचाकी या बसवर आदळली. बसच्या दोन चाकांमध्ये दुचाकी घसरत गेली. अपघातामुळे दुचाकीची पेट्राेल टाकी फुटून घर्षणाने भीषण अाग लागली. 

यात दुचाकीवरील राहुल दत्तू बेरडे (२१) व नितीन रामभाऊ निकम (१९,  दोघेही राहणार वाहेगाव, ता.निफाड) या दाेघांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच बसचालकाने अारडाअाेरडा करून बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
 
काहींनी दरवाजातून तर काहींनी खिडकीतून उड्या मारल्या. काही वेळातच ही संपूर्ण बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. बसमधून बाहेर पडताना काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. बसमधील बॅगमध्ये प्रवाशांचे मौल्यवान दागिने, कपडे व महत्त्वाची कागदपत्रे हाेती. हा एेवज मात्र जळून खाक झाला.
 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भीषण अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...